पालघर जिल्हा गौण खनिज विभागातील अधिकाऱ्या कडून राजस्थान नंबर प्लेट असलेल्या वाहनातून अवैध रित्या कारवाया केल्या जात असल्याचा आरोप.

पालघर

पालघर जिल्हा गौण खनिज विभागातील अधिकाऱ्या कडून राजस्थान नंबर प्लेट असलेल्या वाहनातून अवैध रित्या कारवाया केल्या जात असल्याचा आरोप. संबंधित अधिकारी शासकीय कामकाजासाठी परराज्यातील वाहनाचा वापर करत असल्याने नागरिकांमध्ये विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

विशेष म्हणजे, महसूल विभागाकडून अवैध गौण खनिज, मुरूम आणि रेती वाहतुकीवर कारवाई केली जात असताना चंद्रकांत पवार या संबंधित अधिकाऱ्याने वाहने वापरलेल्या वाहनाची वैधतेबाबत तसेच वाहनाच्या वापराबाबत महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) प्रशासन मात्र मौन बाळगत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

राजस्थान राज्यातील वाहन नोंदणी क्रमांक असलेल्या गाड्यांचा वापर पालघर मध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्याची चर्चा असून, अशा वाहनांची तपासणी नेमकी होते का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, संबंधित वाहनाचे कागदपत्र, कर भरणा, विमा तसेच अधिकृत परवानग्यांची पडताळणी करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. महसूल विभाग आणि आरटीओ प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्यानेच अशा प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, पालघर मधील काही आरटीओ अधिकाऱ्यांवर यापूर्वीही अनियमितता आणि भ्रष्टाचाराचे आरोप झालेले असल्याने आता संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन संबंधित अधिकारावरती कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *