
मुख्यमंत्री विविध कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभर फिरत असतात पालघर जिल्ह्यात आल्यानंतर अनेक कार्यकर्ते भेटत असतात, मीडियासमोर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांच्या मागे उभे राहून आपली किती जवलीक आहे ,हा दाखवण्याचा प्रयत्न सध्या पालघर मध्ये सुरू आहे,
पालघर व डहाणूतील रस्ते व गटारांच्या कामांच्या दर्जावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. दुसरीकडे, जव्हारच्या राजघराण्याने सार्वजनिक सूचना प्रसिद्ध करून राजघराण्याचे नाव, ओळख आणि ऐतिहासिक प्रतीकांचा गैरवापर करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केल्याचे सांगितले जाते. या सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री आल्यानंतर पक्ष प्रमुखांची ही जबाबदारी आहे आपल्या आजूबाजूला असणारे कार्यकर्ते खरोखरच भाजपचे सामाजिक कार्यकर्ते किंवा मुख्यमंत्रीचे ओळखीचे आहेत का अन्यथा नसतील तर त्यांना पाठीमागे उभे कसे केले जाते तर बिचारे आमदार खासदार मुख्यमंत्र्यांच्या बाजूला दिसत सुद्धा नाहीत, त्यामुळे या लोकांची दबंगगिरी, चमकोगिरी पाहायला मिळते, आणि याच दबंगरीतून शासकीय अधिकारी ठेकेदारांना दबावात ठेवून कामे मिळवली जातात आणि हेच कामे बोगस निकृष्ट पद्धतीने केली जातात
