वानगाव मध्ये मुरूम माफीया सचिन शिर्केच्या हाइवा ने घेतला एका निष्पाप मुलीचा बळी.

पालघर जिल्ह्यातील वानगाव येथे भरधाव ट्रकच्या धडकेत एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्राप्ती प्रवीण जाधव असे मृत मुलीचे नाव असून, या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राप्ती जाधव ही आपल्या कुटुंबासोबत मामाकडे जाण्यासाठी निघाली होती. वानगाव चिंचणी रस्त्यावरून जात असताना रेल्वेच्या वितरक कंपनीच्या कामा साठी माती वाहतूक करणाऱ्या भरधाव हाइवा ट्रकने तिला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वानगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या अपघातानंतर संबंधित ट्रकची तपासणी करण्यात आली असता वाहनाची आवश्यक कागदपत्रे नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सचिन शिर्के व त्याच्या साथीदाराकडून परिसरात अवैद्य रित्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या माती वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी हाइवा चालकास माणगाव पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *