डहाणू | वाणगावमध्ये ट्रस्टच्या जागेवर अवैधरीत्या बोल्डर, मुरूम व माती साठवणुकीचा आरोप.

पालघर जिल्ह्यातील वाणगाव परिसरात हरी जीवन चॅरिटेबल ट्रस्टच्या जागेवर शासनाची कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात बोल्डर, मुरूम आणि मातीचा साठा करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जागेवर अनेक दिवसांपासून जेसीबी व डंपरच्या माध्यमातून बोल्डर, मुरूम आणि माती आणून साठवली जात आहे. मात्र या साठवणुकीसाठी महसूल, खनिकर्म किंवा ग्रामपंचायत प्रशासनाची आवश्यक परवानगी घेतली आहे की नाही, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.

यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, संबंधित प्रकरणाची चौकशी करून अवैध साठवणूक होत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन जागेची पाहणी करावी, आवश्यक परवानग्यांची तपासणी करावी तसेच गौण खनिज नियमांचे उल्लंघन झाले असल्यास दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

चौकट स्थानिक नागरिक – शासनाची परवानगी नसताना मोठ्या प्रमाणात मुरूम, माती व बोल्डर साठवले जात आहेत. प्रशासनाने तातडीने चौकशी करून कारवाई करावी.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *