पूरग्रस्त चिंचणीची आमदार राजेंद्र गावित यांच्याकडून केवळ पाहणी; तात्काळ मदत न करता दिले आश्वासन कोणतीही मदत न करता केला परतीचा प्रवास.

पालघर विधानसभा मतदारसंघातील चिंचणी परिसरात आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र गावित यांनी पूरग्रस्त भागाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली व स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
मात्र, या भेटीदरम्यान पूरग्रस्त नागरिकांना तात्काळ आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, पिण्याचे पाणी किंवा इतर मदतीचे वितरण करण्यात आले नसल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. काही सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू केले असताना, लोकप्रतिनिधींकडूनही तत्काळ मदतीची अपेक्षा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पूरामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून अन्न, पिण्याचे पाणी आणि इतर अत्यावश्यक सुविधांची गरज निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष मदतीऐवजी केवळ पाहणी आणि आश्वासनांवर भर दिल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
आमदारांच्या कडून फक्त पूरग्रस्तांची केवळ पाहणी न करता तातडीने मदतकार्य सुरू करावे, नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करावी आणि पुनर्वसनाची प्रक्रिया वेगाने राबवावी, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *