वानगाव–डहाणू मार्गावरील कापशी येथे भरधाव एस. व्ही. पाटील कंट्रक्शन’ डंपरची सहा जनावरांना धडक; चालक फरार.

वानगाव–डहाणू मार्गावरील कापशी येथे  शनिवारी रात्री डहाणू कडून येणाऱ्या एका भरधाव डंपरने रस्त्यावर असलेल्या चार गाई व दोन बैलाना जोरदार धडक दिली. या अपघातात चार जनावरांचा जागेत मृत्यू झाला असून दोन जनावरे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ‘एस. व्ही. पाटील कंट्रक्शन’ असे लिहिलेल्या डंपरचा चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अपघातानंतर चालक डंपरसह घटनास्थळावरून फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच वानगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील तपास सुरू आहे. फरार चालकाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून नागरिकांनी संबंधित चालकावर व संबंधित डंपर मालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *