
मात्र स्थानिक नागरिकांकडून या प्रकल्पाला तीव्र विरोध सुरू झाला आहे. विराज प्रोफाइल प्रकल्पातून होणाऱ्या वायू आणि जलप्रदूषणामुळे मान वारंगडे, गुंदले, कल्लाळे, कांबळगाव, बेटेगाव, खैरे पाडा, कुकडे महागाव या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून जलस्त्रोत, शेत जमीन आणि पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप करत स्थानिक संघर्ष समितीने जन सुनावणी रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.
विराज प्रोफाइल उद्योगाला असणारा विरोध अधिक तीव्र करण्यासाठी शनिवारी मान येथील कारखान्यावर मोर्चा काढून तीव्र निदर्शने करण्यात आली. मात्र बुधवारी होणारी जन सुनावणी रद्द करण्याबाबत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात न आल्याने स्थानिक नागरिक आणि संघर्ष समिती आक्रमक झाली आहे.
