
डहाणू तालुक्यातील दाभोन, ऐना, साखरे, जामशेत सह शेजारील ग्रामीण भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी केंद्रावर जाण्यासाठी बसची सोय उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन पिकप व अन्य मालवाहतूक गाड्यांच्या मदतीने परीक्षा केंद्रावर पोहोचावं लागत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
डहाणू तलासरी, तालुक्यातील अनेक गावांमधून परीक्षा केंद्रे जवळ पास 15 ते 20 किलोमीटर दूर असल्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून खासगी मालवाहु वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे, तर काहींना वेळेत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे. विद्यार्थ्यांनी सांगितले.
दहावी बोर्डाच्या परीक्षेचा आज पहिला दिवस आहे पुढील होणाऱ्या पेपर साठी तरी लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देऊन दहावीच्या परीक्षेच्या कालावधीत विशेष शासकीय बस किव्हा खाजगी बस सेवा सुरू करावी, अशी आर्त हाक्क विद्यार्थ्यासोबत त्यांच्या पालकांनी लोक प्रतिनधी आमदार , खासदार यांना दिली आहे,
जिल्हातील लोक प्रतिनिधी, जिल्हा प्रशासन , शिक्षण विभाग व परिवहन विभागाने समन्वय साधून विद्यार्थ्यांसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी पालकांची मागणी जोर धरु लागली आहे.
