दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा पिकअप मधून
जीवघेणा प्रवास

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या २०२६ च्या दहावी (SSC) परीक्षा आज पासून सुरू झाल्या असून दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डहाणू तालुक्यातील ऐना, दाभोन साखरे , साखरे या भागांतील दहावी कक्षातील विद्यार्थी  परीक्षा देण्यासाठी वानगाव चिंचणी या रस्त्या वरुण दररोज जीव मुठित धरून मालवाहक पिकअप या वाहनातून कोंबून परीक्षेला जात असल्याचे दिसून आले आहे. या भागातील परीक्षाकेंद्र गावापासून जवळ पास 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असल्याने आणि नियमित बससेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी पिकअप वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

या माल वहातुक वाहनांमध्ये  प्रवासी वाहतुकीस परवानगी नसतानाही क्षमतेपेक्षा जास्त अल्पवयीन विद्यार्थ्यांना बसवले जात असून, अनेक जण उभे राहून वाहनाच्या मागील भागात बसून प्रवास करत असल्याचे चित्र समोर आले असून अश्या धोकादायक प्रवासामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हा प्रशासन व वाहतूक प्रशासन वर्ती तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाने त्वरित विशेष बससेवा सुरू करावी किंवा शाळा व शिक्षण विभागाने सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. परीक्षा महत्त्वाची असली तरी जीव अधिक मौल्यवान ” असल्याचे मत पालकांनी व्यक्त केल आहे.

या गंभीर घटने संदर्भात  कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणेवर राहील, असा इशाराही पालकां कडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *