पालघर जिल्ह्यातील मौजे खोच–शिरसोनपाडा येथील वडिलोपार्जित जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर खोटी नावे नोंदविण्यात आल्याचा आरोप करत एका तरुण शेतकऱ्याने थेट नायब तहसीलदारांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज घडली. वेळीच कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला असून तालुक्यात खळबळ उडाली आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार खोट्या दस्तावेजांच्या आधारे मंडळ अधिकारी व संबंधित तलाठी यांनी कोणतेही स्थानिक चौकशी न करता राजकीय दबावाखाली जमिनीचा सातबारा उताऱ्यावर नावे नोंदवली यामुळे माझ्यावर अन्याय झाल्याचे अर्जदाराने नमूद केले असून या अन्यायाविरोधात यापूर्वी मोखाडा पोलीस ठाणे तहसील कार्यालय मोखाडा उपविभागीय अधिकारी कार्यालय जव्हार येथे लेखी निवेदन दिली होती मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यास आरोप करत दहा दिवसात कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा पीडित शेतकऱ्याने दिला होता..
पालघर विधानसभा मतदारसंघातील चिंचणी परिसरात आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र गावित यांनी पूरग्रस्त…
वाढवण बंदराला जोडणाऱ्या प्रस्तावित ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भरावासाठी आवश्यक दगड उपलब्ध करून देण्यासाठी घारगाव येथे प्रस्तावित दगडखाण (डोंगर संपादन) प्रकल्पाच्या पर्यावरणविषयक…