वाणगाव येथील हरी जीवन चारिटेबल ट्रस्टची जागा धर्मादाय आयुक्तांच्या परवानगी नंतर लॉथलोरियन इस्टेट्स एलएलपी कंपनीकडून खरेदी.

पालघर : वाणगाव येथील हरी जीवन चारिटेबल ट्रस्टच्या मालकीची जागा सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आणि धर्मादाय आयुक्तांची आवश्यक परवानगी प्राप्त केल्यानंतर लॉथलोरियन इस्टेट्स एलएलपी (Lothlorien Estates LLP) कंपनीने खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

सदर व्यवहार महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमांतर्गत (Bombay Public Trusts Act) लागू असलेल्या नियमांचे पालन करून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. धर्मादाय संस्थांच्या मालमत्तेची विक्री अथवा हस्तांतरण करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांची पूर्वपरवानगी आवश्यक असते. संबंधित परवानगी मिळाल्यानंतरच व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या व्यवहारामुळे संबंधित जागेच्या मालकीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे, ही खरेदी प्रक्रिया कायदेशीर चौकटीत पार पडल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच सर्व आवश्यक कागदपत्रे आणि नोंदी संबंधित विभागांकडे सादर करण्यात आल्याचेही सांगितले आहे.

सदर व्यवहाराची नोंद संबंधित महसूल व नोंदणी कार्यालयात करण्यात आल्याचे समोर आले आहे.
ही जागा भविष्यात जेएनपीटी च्या माध्यमातून वाढवन बंदर प्रकल्पाच्या कार्यालयाच्या , निवासी  व्यावसायिक अथवा इतर कोणत्या विकास प्रकल्पासाठी वापरली जाणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, या व्यवहारामुळे स्थानिक नागरिक, ग्रामस्थ तसेच सामाजिक क्षेत्रात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, संबंधित व्यवहारातील कागदपत्रे, जमिनीचे क्षेत्रफळ, व्यवहाराची रक्कम तसेच प्रस्तावित विकास आराखडा याबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *