डहाणूत कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरण; भाजप नेत्या चित्रा वाघ यांची पोलीस ठाण्याला भेट.

पालघर, प्रतिनिधी : पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरण समोर आल्याचा आरोप करत भाजप नेत्या  यांनी शनिवारी डहाणू पोलीस ठाण्याला भेट दिली. या प्रकरणी दाखल गुन्ह्याबाबत त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून तपासाची माहिती घेतली.
डहाणू पोलीस ठाण्यात १ जून रोजी दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, एका तरुणाने मोठ्या बहिणीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिचे अश्लील व्हिडिओ तयार केले व त्याद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. तसेच अल्पवयीन लहान बहिणीलाही प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी डहाणू पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी सध्या फरार आहे.
पोलीस ठाण्याबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना चित्रा वाघ यांनी आरोपीचे घर अनधिकृत असल्याचे आढळल्यास त्यावर बुलडोझर कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच गुजरातप्रमाणे आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाहांबाबत कुटुंबीयांना माहिती देण्याची तरतूद असलेला कायदा महाराष्ट्रातही लागू करण्याची मागणी त्यांनी केली.
याशिवाय, फूस लावून पालघर जिल्ह्यातील अनेक मुलींना लंडनला नेण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. या संदर्भातील सविस्तर माहिती राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री  यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले
दरम्यान, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी डहाणू पोलिसांची दोन पथके परराज्यात रवाना झाली असल्याची माहिती डहाणूच्या पोलिस उपअधीक्षक  यांनी दिली. आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *