मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना पालघरचे सामाजिक कार्यकर्ते बंड्या मात्रे यांनी वेगळे उदाहरण घालून दिले आहे. अर्धनग्न अवस्थेत असूनही त्यांनी पावसात अडकलेल्या नागरिकांच्या मदतिला आले धावून.

पालघर : मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना पालघरचे सामाजिक कार्यकर्ते बंड्या मात्रे यांनी वेगळे उदाहरण घालून दिले आहे. अर्धनग्न अवस्थेत असूनही त्यांनी पावसात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी धाव घेतली.

सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी गटारामध्ये पाणी साचले असून नागरिकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत स्वतःच्या सोयी-सुविधांची व जीवाची पर्वा न करता पालघर च्या बंड्या मात्रे यांनी प्रवासामध्ये अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी गटारा मधील दगड ,रेती ,वाळू काढून सर्वसामान्य नागरिकांना पुराच्या पाण्याच्या प्रवहातून दिलासा  दिला आहे.

स्थानिक नागरिकांनी त्यांच्या या तत्परतेचे कौतुक केले असून, आपत्कालीन परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपणारे असे कार्य प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *