संकल्प युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून बोईसरमध्ये भव्य शिवराज्याभिषेक सोहळा; शिवव्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

बोईसर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवसेना आणि संकल्प युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बोईसर येथे भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने बोईसर येथील टीम हॉलमध्ये विशेष शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव तसेच त्यांच्या विचारांचा वारसा जतन व प्रसारित करण्याच्या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक व शिवसेना जिल्हा युवा नेते सौरभ आप्पा यांनी दिली.
शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली असून त्यांच्या विचारांचा जागर समाजात अधिक व्यापक करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे, जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, उपनेते राजेश शहा, आमदार विलास तरे, शिवसेना पदाधिकारी मुकेश पाटील, जनार्दन चांदणे, चंदन सिंग, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घेतला.
कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेतील योगदानावर प्रकाश टाकण्यात आला.
उपस्थितांनी शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण करून समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *