विक्रमगड येथे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेला महसूल अधिकारी सी. के. पवार सध्या पालघर जिल्हा गौण खनिज कार्यालयात कार्यरत.

पालघर जिल्ह्यातील गौण खनिज कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी चंद्रकांत के. पवार यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ अटक केल्याची घटना काही महिन्या पूर्वी समोर आली होती. या कारवाईमुळे पालघर जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागा ठाणे कडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत के. पवार यांनी संबंधित एका कामासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली. यावेळी चंद्रकांत पवार यांस लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते.

सध्या चंद्रकांत के. पवार हे पालघर जिल्हा गौण खनिज सारख्या अतिमत्त्वाच्या कार्यालयात कार्यरत असल्याने या प्रकरणाची जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू आहे. गौण खनिज विभागातील कामकाज आणि परवानग्यांशी संबंधित व्यवहारांमध्ये मोठा भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत असून अश्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *