पालघर वादग्रस्त व्यक्तीची पालघर जिल्हा युवासेना संपर्क प्रमुखपदी नियुक्ती; कार्यकर्त्यांत नाराजी.


पालघर जिल्ह्यात युवासेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी एका वादग्रस्त व्यक्तीची नियुक्ती करण्यात आल्याने संघटनेत नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. या नियुक्तीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून अनेकांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीवर यापूर्वी विविध वाद आणि आरोप झालेले असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो, अशी भीतीही काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. “जिल्ह्यात दीर्घकाळ काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून अशा व्यक्तीची नियुक्ती करणे योग्य नाही,” अशी प्रतिक्रिया काही पदाधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, या निर्णयाविरोधात काही कार्यकर्ते लवकरच वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

संघटनेत एकजूट राखण्यासाठी या नियुक्तीचा फेरविचार करावा, अशी मागणीही जोर धरत आहे.
याबाबत संबंधित व्यक्ती किंवा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. मात्र, या प्रकरणामुळे पालघर जिल्ह्यातील युवासेनेच्या अंतर्गत राजकारणाला उधाण आले असल्याचे चित्र आहे.

यापूर्वी संबंधित पदाधिकाऱ्यांचे नांदगाव बीच वरील एका रिसॉर्ट वरील अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत त्यामुळे संबंधित विरोध असल्याचे समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *