
पालघर: गेल्या अनेक दिवसा पासून पालघर जिल्ह्यात अमली पदार्थ विक्री करणाऱ्या गुंडांची पालघर पोलिसांच्या कडून ठोस कारवाया सुरु असून आता याच प्रकरणात डहाणू तालुक्यातील एका राजकीय पदाधिकाऱ्याचे नाव समोर आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
संबंधित व्यक्ती ही समाजातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे.
काही महिन्यापूर्वी वाणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कारवाईदरम्यान काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते, त्यांच्याकडून चौकशी सुरू केल्या नंतर. प्राथमिक तपासात या प्रकरणाचे धागेदोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका युवा राजकीय पदाधिकाऱ्यापर्यंत पोहोचल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे. “समाजात जबाबदारीची पदे भूषवणाऱ्या व्यक्तींनीच असे कृत्य करणे गंभीर बाब आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून या बाबत
संबंधित राजकीय पक्षाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
