पालघरच्या सुहाष च्या गंधामुळे पालघर नगर परिषदेत भाजपवर पराभवाची नामुष्की ? स्वतःच्या मर्जीतल्या उमेदवारांना उमेदवारी दिल्याने भाजपच्या एक निष्ठां कार्यकर्त्यांमध्ये होती नाराजी

पालघर : विनायक पवार
पालघर जिल्ह्यात झालेल्या तीन नगरपरिषद आणि एका नगरपंचायतचे निकाल हाती आले असून जिल्ह्यात महत्त्वाचे असलेल्या पालघर आणि डहाणू या दोन नगरपरिषदांवर भाजपची मोठ्या प्रमाणावर पीछेहाट झाल्याचे पाहायला मिळाल . कधीकाळी कमकुवत असलेल्या पालघर नगर परिषद हद्दीतील भाजपला अचानक नगराध्यक्षपदाचे डोहाळे लागले असून मासवनच्या एका सुहासी गंधामुळे भाजपवर पराभवाची नामुष्की ओढवल्याचं आता राजकीय जाणकारांकडून सांगण्यात येते. 

भाजपच्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना डावळून सर्वच राजकीय पक्षांची कनिष्ठ संबंध ठेवलेल्या या व्यावसायिकाने भाजपला अनेक आपल्या मर्जीतले उमेदवार दिल्याने भाजपमधील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. विशेष म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत सुहासी गंधा सोबत असलेल्या अशोकांना देखील स्वतःच्या गळ्यात पराभवाची माळ घालावी लागली .

अचानक बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांना नगरसेवक पदाची उमेदवारी दिल्याने याचा थेट परिणाम मतदानावर झाला असून भाजपला पराभवाची नामुष्की सहन करावी लागली आहे.  विशेष म्हणजे हे व्यावसायिक नेहमीच सर्वच राजकीय पक्षांच्या वरिष्ठांची संबंध ठेवून असल्याने स्थानिकांची त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर नाराजी पाहायला मिळते.  मात्र असं असलं तरी राष्ट्रवादीतील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी देण्यासाठी दबाव तंत्र वापरून या व्यावसायिकाने भाजपचीच कोंडी केल्याचा पाहायला मिळतंय. 

यापूर्वी अनेक आमदारांना त्यांनी आपण तुम्हाला निवडून आणून देतो असा ठाम विश्वास देऊन त्यांच्यावर पराभवाची नामुष्की उडवली होती त्यातच आता भाजपला हाताशी धरून भाजपलाच कमकुवत करण्याचं काम पालघर नगरपरिषदेत या व्यावसायिकाने केल्याने वरिष्ठ आता यावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *