जिल्हयात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरु

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – जिल्हा प्रशासन पालघर




पालघर दि. 25: सध्या जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवडयाबाबत काही ठिकाणी अफवा पसरत असल्याचे निदर्शनास येत आहे. तथापि, पालघर जिल्हयात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरु असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण झालेला नाही.

अफवा पसरवणे किंवा चुकीची माहिती प्रसारीत करणे हा कायद्याने दंडनिय अपराध आहे. अश्याप्रकारचे कृत्य करणा-या व्यक्तीवर प्रशासन कठोर कायदेशीर कारवाई करणार आहे.

पालघर जिल्हयात पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरीकांनी पेट्रोल डिझेलचा अनावश्यक साठा करु नये तसेच खोटया अफवांवर विश्वास ठेवून विनाकारण पेट्रोलपंपावर गर्दी करु नये. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा नियमितपणे सुरु असून नागरिकांनी संयम राखावा व प्रशासनास सहकार्य करावे.

पालघर जिल्हयामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याने नागरिकांनी शांतता राखून खोटया अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *