महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमेवरील तलासरी तालुका बनला अवैद्य गुटख्याची वाहतूक करणारा हॉटस्पॉट
नाजीम व त्याचा साथीदार शिवाजी करत आहेत अवैध गुटख्याची वहातुक.

कर्करोग व तत्सम जीवघेण्याऱ्या आजाराला आमंत्रण देणाऱ्या गुटख्याला महाराष्ट्रात प्रतिबंध असतानाही गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रत गुजरात सीमेवरील तलासरी येथून मोठ्या प्रमाणात पालघर मधील नजीम, व त्याचा साथीदार शिवाजी हे गुटखा माफिया अवैध वाहतूक करत असल्याच समोर आल  आहे. गुजरातमधून महाराष्ट्रात येणारा हा गुटखा गुजरात राज्यातील उमरगाव, भिलाड, वापी, येथून येऊन तो पुढे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या दापचारी तलासरी येथील चेक पोस्ट वरून तो पालघर, ठाणे, मुंबई , पुणे, तसेच राज्याच्या विविध ठिकाणी वहातुक करून पुरवला जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

या गुटख्या मध्ये घातक प्रतिबंधित पानमसाला व सुगंधी तंबाखू असल्याचे यंत्रणेने वेळोवेळी उघड केले आहे. राज्य शासन तरुणाईला कर्कराेगापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच दूसरी कड़े मात्र गुजरातच्या सीमेवरून महाराष्ट्रात सर्रासपणे गुटख़्याची वहातुक होत आहे. पालघर जिल्ह्यातील  नाजीम व त्याचा साथीदार शिवाजी या गुटखा माफियांच्या नावाने रोज साधारण दहा ते पंधरा गुटख्याच्या गाड्या गुजरात मधून येऊन तो महाराष्ट्र, गुजरात राज्याच्या सीमेवरील तलासरी मधून राजरोज पणे वाहतूक करत आहेत.

गुजरातमधून काही वाहनांद्वारे सकाळच्या व रात्रीच्या वेळी गुटखा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांची मुंबई अहमदाबाद महामार्गावरील तलासरी  येथून अवैद्यरीत्या राज्यात एंट्री होत आहे. महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असताना देखील सीमावर्ती भागातून हा गुटखा मोठ्या प्रमाणावर बाजारात पोहोचत असल्याच समोर आल आहे.
या अवैद्य वाहतुकीमुळे तरुण पिढीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत नागरिकांनी तात्काळ कारवाईची मागणी करत पोलिस अधिकारी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने संयुक्त तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *