
या प्रकरणी शिंदे यांनी अर्धापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तहसीलदार रेणुकादास देवणीकर हे रजेवर गेल्यामुळे नायब तहसीलदार आर.डी. शिंदे यांच्याकडे पदभार देण्यात आला. त्यामुळे शिंदे यांनी अर्धापूर परिसरात रेतीची अवैध वाहतूक रोखण्यासाठी प्रयत्न करीत होते. परंतु हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी तलाठी प्रदिप उबाळे पाटील यांनी पोलीस कर्मचारी शिवा पाटील यांच्याशी संगनमत करून प्रभारी तहसीलदार शिंदे यांना धडा शिकविण्याच्या दृष्टीकोनातून दमदाटी करत व मारहाण केली.
या प्रकरणी प्रभारी तहसीलदार आर.डी. शिंदे यांनी अर्धापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
