
बोईसर मधील गणेश नगर, काटकर पाडा, भीम नगर, दांडी पाडा, भैय्या पाडा, धोडीपूजा या भागात अमन खुलेआम गुटख्याची बेकायदा जोरात सुरू आहे.
एमआयडीसी आणि झोपडपट्टी परिसरातील टपऱ्यांवर अमन कडून पुरवठा केलेला गुटखा बिनधास्तपणे नागरिकांना विकला जात आहे. पालघर पोलीस अधीक्षक यांच्या सक्रियतेमुळे गेले काही महिने गुटख्याची विक्री बंद होती, मात्र गेल्या काही दिवसांपासून बोईसर शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा माफिया अमन कडून गुटखा विक्री पुन्हा सुरू झाली आहे.
बोईसर परिसरात अमन याचे बेकायदा गुटखा सप्लायचे मोठे नेटवर्क असून त्याच माध्यमातून तो गुटखा विक्रीसारखे अवैध धंदे करीत आहे.
