
पालघर : जिल्ह्यात विविध ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर, पंतप्रधान ग्राम सड़क योजना, मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना व जिल्हा परिषद बांधकाम विभागा कडून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांबाबत गंभीर तक्रारी समोर येत आहेत. जिल्यातील काही दिग्गज ठेकेदारांनी कमी दरात बिलो भरून कामे मिळवली असून प्रत्यक्षात रस्त्याच्या बांधकामा साठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून रस्ते बांधले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.
जिल्ह्यातील विविध योजनेतून, पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार, वाडा, मोखाडा, विक्रमगड तालुक्यातील करोडो रुपयाचा निधी खर्च करून मुख्य रस्त्यांची दुरुस्ती व मजबुतीकरण ची कामे सुरू आहेत ती कामे दर्जाहीन साहित्य वापरून निकृष्ट दर्जाची कामे सुरू असून जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये नुकतेच काँक्रिटीकरण व डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवर काही दिवसांतच खड्डे पडू लागल्याचे चित्र समोर आल्याने बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्यात जानेवारी , फेब्रुवारी, व मार्च महिन्याच्या सुरुवातीस करोड़ो रूपये खर्च करून मजबुतीकरण आणि दुरुस्ती देखभाल करून बांधण्यात आलेल्या रस्त्यांची अवस्था निकृष्ट बांधकामामुळे बिकट झाल्याने येत्या पावसाळ्यात घातक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामांच्या दर्जाची तपासणी काटेकोरपणे होत नसल्याने ठेकेदार मनमानी करत आहेत. कमी बिलो भरून कामे मिळवली जातात आणि नंतर खर्च वाचवण्यासाठी बांधकाम अधिकाऱ्यांना हाताशी धरून दर्जात तडजोड केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी आता पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी तात्काळ या कामांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी, तसेच निकृष्ट रस्त्यांची पुन्हा दुरुस्ती करून घ्यावी, अशी मागणी केली आहे.
