
या माल वहातुक वाहनांमध्ये प्रवासी वाहतुकीस परवानगी नसतानाही क्षमतेपेक्षा जास्त अल्पवयीन विद्यार्थ्यांना बसवले जात असून, अनेक जण उभे राहून वाहनाच्या मागील भागात बसून प्रवास करत असल्याचे चित्र समोर आले असून अश्या धोकादायक प्रवासामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हा प्रशासन व वाहतूक प्रशासन वर्ती तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाने त्वरित विशेष बससेवा सुरू करावी किंवा शाळा व शिक्षण विभागाने सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. परीक्षा महत्त्वाची असली तरी जीव अधिक मौल्यवान ” असल्याचे मत पालकांनी व्यक्त केल आहे.
या गंभीर घटने संदर्भात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणेवर राहील, असा इशाराही पालकां कडून देण्यात आला आहे.
