राजकीय वरदहस्त लाभलेल्या सरावली येथील प्रदूषणकारी गो ग्रीन इको टेक सोल्युशन कंपनीवर कारवाई करण्यासाठी आमदार विनोद निकोले यांचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व राज्याचे मुख्य सचिव यांना निवेदन.

ठाणे येथील सत्ताधारी पक्षाच्या माजी आमदाराचा राजकीय वरदहस्त लाभलेल्या सरावली येथील सर्वे क्रमांक ५५ वरील गो ग्रीन इकोटेक सोल्युशन प्रा. ली. या कंपनीवर कड़क कारवाई करण्यासाठी डहाणूचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी पर्यावरण व वातावरण बदल मंत्री पंकजा मुंडे व राज्याचे मुख्य सचिव यांची भेट घेऊन निवेदन दिले.

सरावली येथील गो ग्रीन इकोटेक सोल्युशन कंपनी नियमबाह्यपणे घातक रासायनिक घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम करते. त्याचप्रमाणे कंपनीने जिल्हा प्राधिकरणाची बांधकाम परवानगी न घेता इमारतीचे अनधिकृत बांधकाम केले आहे. कंपनी पुनरप्रक्रिया केलेल्या रासायनिक घनकचऱ्याची बेकायदा विल्हेवाट लावीत असल्याचा आरोप होत असून यामुळे परिसरातील नागरिकांना असह्य दुर्गंधी, प्रदूषण, दूषित पाणी इत्यादी समस्यांना तोंडावर लागत आहे. कंपनी विरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार तक्रारी करून देखील कारवाई होत नसल्याने अखेर आमदार निकोले यांनी विधिमंडळाच्य नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात या कंपनी विरोधात कारवाईसाठी लक्षवेधी सूचना केली असून राज्याच्या पर्यावरण वातावरण बदल मंत्री पंकजा मुंडे व राज्याचे मुख्य सचिव यांची भेट घेऊन त्यांना गो ग्रीन इकोटेक सोल्युशन या कंपनीवर कारवाई तसेच कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या  प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर येथील वीरेंद्र सिंग या अधिकाऱ्यांवर निलंबन करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *